संतवाणी
माझ्या मना लागो चाळा पहावया विठ्ठला डोळां
माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां॥१॥
आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥
तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥२॥
तुका म्हणे देवा । देई चरणांची सेवा ॥३॥
Newer Post
Older Post
Home