येई हो विठ्ठले भक्तजन वत्सले


येई हो विठ्ठले भक्तजन वत्सले करुणा कल्लोळे पांडुरंगे पांडुरंगे भक्तजन वत्सले ||धृ||
सजल जलद घन पीतांबर परिधान येई उध्धरणे केशीराजे भक्तजन वत्सले ||१||
नामा म्हणे तू विश्वाची जननी क्षिराब्धि निवासनि जगदंबे भक्तजन वत्सले ||२||
येई हो विठ्ठले भक्तजन वत्सले येई हो विठ्ठलेपांडुरंग पांडुरंग