अभंग ४०९ आलियें धांवति धांवति भेट होइल म्हुण

अभंग ४०९ आलियें धांवति धांवति भेट होइल म्हुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥१॥ आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ध्रु.॥ लाविला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभाळितां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥२॥ जळो आतां संसारु वो कई शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥३॥ अर्थ :- श्रीकृष्णची भेट होईल म्हणून मी धावत आहे; परंतु भेट होण्याची वेळ निघुन गेली आणि भेट न झाल्यामुळे धावन्याचा शीन उरला आहे ।।1।। आता कृष्णची भेट होण्यासाठी काय करू? त्याच्या भेतिवाचुन माझा प्राण जात आहे. त्याचा छंद माला लागला आहे. त्याच्या भेटीची मोठी आशा लागून राहीलि आहे ।।ध्रु।। प्रपंच्यात सर्वांचे जेवनखाण, सर्वांच्या मर्जी संभाळणे या ओढ़ातानित आणि इतर कामाच्या व्यापात गुंतल्यामुळे सारी कामे यथासांग केल्यामुळे उशीर झाला आणि कृष्णची भेट झाली नाही. त्यामुळे मी दुःखीकष्टी झाले आहे! ।।2।। तुकाराम महाराज म्हणतात, आग लागो या संसाराला! याचा शेवट कसा, कढ़ी होईल? माझा स्वामी श्रीकृष्ण त्यांच्यासाठी जीव झुरतो ।।3।।