अभंग ४१० आणीक काय थोडीं

गाथा अभंग ४१० आणीक काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥१॥ सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥ सदा घालिता हुंबरी । एक एकांचे न करी ॥२॥ तुका म्हणे घरीं माय । वेळोवेळां मारी ॥३॥ अर्थ :- जगात इतर गौळयांची मुले काय थोड़ी आहे का ? परंतु ती खोट्या, वाइट बुद्धिची आहेत ।।1।। त्यांची इंद्रियरूपी गुरे नेहमीच मोकाट असतात; त्यामुळे सतत फजीती होते ।।ध्रु।। त्यांच्यात नेहमीच तंटे-वाद होतात. कोणीही कोणाचे एकत नाही. ती काम करीत नाहीत ।।2।। तुकाराम महाराज म्हणतात, त्यांची घरी असलेली मायारुपी आई त्यांना नेहमी नाराते ।।3।।