अभंग ३५६
बरवें बरवें केलें विठोबा बरवें । पाहोनि आंत क्षमा अंगी कांटीवरी मारविलें ॥१॥
शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटंबिलें ॥२॥
तुका म्हणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतलें रे ॥३॥
अर्थ :-
विठोबा, तू खुप चांगले केलेस. माझ्या सहनशक्तिचा अंत पाहिलास. मंबाजिकडून काठ्या-लाठ्यांनी मला मार दिलास ।।1।।
त्याने अनितीने माल शिविगाळ केली, माझी फार विटंबणा केली ।।2।।
परंतु तू मात्र माल क्रोधाच्या हातातुन सोडवून घेतलस रे ! (मला राग येवु दिला नाहीस) ।।3।।