अभंग ३५५ न सोडीं न सोडीं न सोडीं ।

अभंग ३५५
न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥१॥
भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ध्रु.॥
शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥२॥
तुका म्हणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ॥३॥

अर्थ :-
विठ्ठोबा, मी तुझे चरण नाही सोडणार ।।1।।
माझ्यावर कितीही मोठे संकट आले, जीवावर बेतले तरी मी तुझे चरण कदापि नाही सोडणार ।।ध्रु।।
शस्त्राच्या धारणे माझ्या शरीराचे शंभर टुकड़े केले तरीही मी घाबरणार नाही ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, आधिपासून मी बुद्धीला येणाऱ्या संकटांनविषयीची जाणीव देऊन सावध केले आहे ।।3।।