अभंग ३५८ कां होती कां होती ।

अभंग ३५८
कां होती कां होती । देवा एवढी फजीती ॥१॥
मुळीं वर्म नसतों चुकलों । तो मी ऐसें चित्तीं ॥ध्रु.॥
होणार होऊनि गेलें । मिथ्या आतां खंती रे ॥२॥
तुका म्हणे पुरे आतां । दुर्जनाची संगती रे ॥३॥

अर्थ :-
देवा, माझी एवढी फजीती का होत आहे? ।।1।।
मूळ वर्म मी चुकालो नसतो, ते चित्तात् धरून ठेवले असते तर माझी अशी फजीती झाली नसती ।।ध्रु।।
जे व्हायचे ते होते, ते होऊन गेले. त्याबद्दल खंत कशाला करत बसु? ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अता दुर्जनांचा सहवास पुरे झाला आता ।।3।।