अभंग ३५९
सोडवा सोडवा । सोडवा हो अनंता ॥१॥
तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ध्रु.॥
कोणा लाज नेणां ऐसें । आणिकां शरण आम्ही जातां ॥२॥
तुका म्हणे सखया । माझ्या रखुमाईच्या कांता ॥३॥
अर्थ :-
अनंता, मला दुःखातुन, यातनांमधुन सोडवा हो, सोंडवा. तुमच्या शिवाय दूसरा प्राणदाता कोण आहे ? ।।1।।
तुम्हाला टाकून आम्ही इतरांना शरण गेलो, तर कोणाला लाज वाटणार बरे ? ।।2।।
(यासाठी) तुकाराम महाराज म्हणतात, हे सख्या, रुक्मिनिकांता, मला या जाचातुन सोडव ।।3।।