अभंग ४०६ आता न यें मागें

गाथा अभंग ४०६ आता न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥१॥ कां गो कलित्यां कोल्हाल । तुम्ही भलत्या च सकल । वेचाल ते बोल । झुटे होती बोलिले ॥ध्रु.॥ याचे भेटी माझें मन । स्वरुपीं ठाकले लोचन । वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥२॥ काज काम नको जालें । बीजें नावरे बोलिलें । याचिया भेदिलें । कामबाणीं अंतर ॥३॥ या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें । घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥४॥ आतां मोटी वार । माझी नका धरूं चार । तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों ॥५॥ अर्थ :- एक गौळण म्हणते, सख्यांनो, मी आता घरी परत येणार नाही. कृष्णच्या प्रेमाने मी येथे आले आहे. या कारणाने सारे जग जरी माझ्यावर कितीही रागावले तरी मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही ।।1।। तुम्ही अभक्त, अनधिकारी आहात. माझ्याबद्दल आग्रह का धरता ? तुम्ही जे काही बोलाल, ते असत्य असेल ।।ध्रु।। माझे मन व डोळे श्रीकृष्णस्वरुपात स्टिर झाले आहे. त्यापासून वेगळे होने मला रुचत नाही ।।2।। माला घरकाम नकोस झाले आहे ।।3।। दुसर्याचे शब्द कानावर आलेले मला आवडत नाहीत. कृष्णच्या मदनबाणाने माझे ह्रदय घायाल झालेले आहे. कृष्णशिवाय असलेल्या जीवनाला आग लागो - असे माझे मन जे दृढ़ निश्चय करत आहे, तो बदलने शक्य नाही ।।4।। तुकाराम महाराज म्हणतात, आता कोणीही माझ्याकडून फार अपेक्षा धरु नका. तुकारामाचा दातार आणि मी एका शय्येवर झोपलो आहे ।।5।।