अभंग ४०० कोणी एकी भुलली नारी ।

गाथा अभंग ४०० कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥ देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥ आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥२॥ तुका म्हणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥३॥ अर्थ :- एक गौळण हरिच्या लावन्यरूपाला भुलली. बाजारात दूध विकायला गेली अस्ता 'दूध घ्या' असे म्हणन्या एवजी 'हरी घ्या' असे म्हणू लागली. ।।1।। हरिचे रूप तिने डोळयाने पाहिले . तिच्या ध्यानी मनी तेच ठसले होते. म्हणूनच ती 'हरी घ्या' असे म्हणू लागली होती ।।ध्रु।। स्वताच्या स्थितिचा तिला विसर पडला आणि गोविंदाच्या रूपाच्या-गुणांच्या वर्णनात तल्लीन झाली ।।2।। तुकाराम माहाराज म्हणतात, बाजारातील अभक्त तिला भघुन हसत होते, परंतु तिचे कान त्यांच्याकडे नव्हते ।।3।।