अभंग ३६७
करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥१॥
आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥
पावोत आत्मिस्थति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥
तुका म्हणे छंद । आम्हां हरिच्या दासां निंद्य ॥३॥
अर्थ :-
परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी कोणी तपच्यर्या करतो, तर कोणी देह अग्नीला अर्पण करतो ।।1।।
आम्ही मात्र त्या वाटला जाणार नाही ; तर पंढरीच्या वाटेवर भक्तीने, श्रध्येने नाचत राहु ।।ध्रु।।
कोणाला आत्मस्तिति प्राप्त होवो अथवा कुणाला मुक्ती मिळो ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, हरिच्या नामस्मरनाशिवाय इतर छंद आम्हाला (हरिदासांना) वर्ज आहेत ।।3।।