अभंग ३४०
वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥१॥
तरी च तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥
आणिकां गुणां पोटीं वाव । दावी भाव आपुला ॥२॥
तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥३॥
अर्थ :-
ज्याचा कंटाळा येणार नाही किव्हा जे पोटाला बाधनार नाही, असे अन्न शिजवावे ।।1।।
तरच ते गोड वाटेल व् पचेल् ।।ध्रु।।
असे रसदार, चविष्ट, पाचक अन्न पोटात गेले तर ते आपल्या शरीरावर् प्रभाव दाखवेल ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, असे शुद्ध अन्न सेवन केल्याने शुद्ध भाव, शुद्ध चित्त निर्माण होते ।।3।।