अभंग ४२१ जाली झडपणी खडतर देवता

गाथा अभंग ४२१
जाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥१॥
मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥
नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥२॥
तुका म्हणे कळों आलें वर्तमान । माझें तों वचन आच्छादलें ॥३॥


अर्थ :-
खडतर अशा या विठ्ठल देवतेने मला झडपले आहे. ही देवता अंगात संचारली आहे. ती आता निघु शकत नाही ।।1।।
माझ्यावर कोनात्याच् औषध-उपचारांचा परिणाम होणार नाही. माला ते काही सहन होणार नाही ।।ध्रु।।
माझ्या जीवनाचा आता काहीही भरवसा नाही. मला फक्त चंद्रभागेच्या तिरावर देवाच्या चरणी नेवून घाला ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, हे वर्त्तमान तुम्हाला कळेल, की माझे बोलने संपले ।।3।।