अभंग ३७२ देव सखा जरी ।

अभंग ३७२
देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥१॥
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ध्रु.॥
देवाची जतन । तया बाधूं न शके अग्न ॥२॥
तुका म्हणे हरी । प्रर्हा दासि यत्न करी ॥३॥

अर्थ :-
देव तू ज्यांचा सखा-सोयरा आहे, पाठिराखा आहे, त्यांच्यावर सर्व जग माया प्रेम करते ।।1।।
असा प्रत्यक्ष अनुभव येवूनसुद्धा भगवंताची कृपा संपादन न करता कहींचा जिव कासाविस होतो ।।ध्रु।।
ज्याचे रक्षण देव करतो, त्याला अग्निचेही भय नसते ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, भक्त प्रल्हादा करता भगवंताने अशेच् प्रयत्न केले होते ।।3।।