अभंग ३५३ पतनासि जे नेती ।

अभंग ३५३
पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥
विधीपुरतें कारण । बहु वारावें वचन ॥ध्रु.॥
सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥२॥
तुका म्हणे दुरी । राखतां हे तों ची बरी ॥३॥

अर्थ :-
एखादी स्त्री स्नेह व प्रितिचे सोंग करते आणि आपल्या पतीला अधोगतिला नेते ।।1।।
तिच्या बरोबर धर्मशास्त्रानुसार संबंध राखावा आणि कारनापुरतेच् बोलावे ।।ध्रु।।
ती खोटे-खोटे गोड बोलते, लडिगोडी लावते, संसारात गुंतवते आणि सर्वस्व लूटते ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, अशा दुराग्रह स्त्रीला दूर अंतरावार् ठेवणेच सुखाचे आहे ।।3।।