अभंग ३६९
माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥१॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥
जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥२॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटीं ॥३॥
तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥
अर्थ :-
माझ्या मनाचा भाव जाणून गुरु महाराजानि मला असा उपदेश केला ।।1।।
माझ्या आवडीचा साधा सोपा मन्त्र सांगितला. यात कोठेही गुंता नाही, हा अतिशय सोपा ऐसा मंत्र आहे ।।ध्रु।।
अनेक साधुसंत या नाममंत्राच्या आधारे भवसिंधु तरुन पुढे गेले ।।2।।
जाणत्या व नेणत्या अशा दोघांच्या आवडीनुसार त्याना भवसागर तरुन जाण्यासाठी सांगड़ी, ताफे, पेटे अशी साधने दिली ।।3।।
तुकाराम महाराज म्हणतात, कृपासागर ऐसा पांडुरंग सर्वाना तारुन नेण्यास समर्थ आहे. गुरु महाराजांनी हा तारु मला दाखविला ।।4।।