अभंग ३९७ कोठें मी तुझा धरूं गेलें संग

अभंग ३९७ कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥१॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ध्रु.॥ रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोंवतीं मी ते माझी ॥२॥ तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला । बोलीं च अबोला करूनियां ॥३॥ अर्थ :- एक गौळण महंते, की तुझी सांगत करण्याची बुद्धी मला कोठुन झाली असे वाटते; कारण त्या मुळे सारे लोक (वेडी म्हणून) माझ्या पाठीसी लागले आहे ।।1।। हे गोपाळा, माझ्यापसुन दूर सरक. खोते छंद आम्हाला लावू नकोस ।।ध्रु।। तुझ्या रूपलावन्याने माझी चित्तवृत्ति हरपली आहे. पाती, पुत्र हे देहसंबंधी ही मी विसरून गेले. त्यांचे भान मला राहिले नाही ।।2।। तुकाराम महाराज म्हणतात, बोलता बोलताच अबोल करून माझे स्वामी अभेदाने माझ्या प्राणांत जावून बसला आहे ।।3।।