अभंग ३५०
कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥
वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ध्रु.॥
कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥२॥
तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो शंड ॥३॥
अर्थ :-
ज्याची वाणी अमंगळ आहे, तो निश्चितच जारिपोटि जन्माला आला आहे ।।1।।
तो नेहमी परनिंदा करतो, त्याची वाणी कधीही गोविंदाचे नामस्मरण करीत नाही ।।ध्रु।।
त्यामुळे तो अंती नरकाला जातो आणि तिथे गेल्यावर त्याला विश्राती कशी मिळणार ? ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, ऐसा तो धर्मद्वेशि यमाच्या दंडास पात्र ठरनाराच् ना ! ।।3।।