यशोदे तुला येईल राग । आपुल्या पोरा कांही सांग


राग -मल्हार

यशोदे तुला येईल राग । आपुल्या पोरा कांही सांग ॥धृ॥ 
अंधारी लपत । पोरें करिती आकान्त ॥
एक म्हणे धरी तन । याचे उपटीन कान ॥
तोंड करूनि वांकडे । मला म्हणे तशीच रडे ॥१॥
 
सांगतसो शिकवणा । खोडी नको करूं कान्हा ॥
देव पोरां शिकवीत । गोरस आणा रे समस्त ॥
आम्ही निजलों समस्त । काजळ मुखासी लावीत ॥२॥

मेले आणूनियां सर्प । माझ्या पोरा दावी दर्प ॥
योगियाचे न ये लक्षा । त्यासी लावुं म्हणती शिक्षा ॥
अनंत गाऱ्हाणी । नामा म्हणे कीर्ति वानीं ॥३॥